घंटा गाडीत माती भरून त्यावर कचरा
| पनवेल | प्रतिनिधी |
कचर्याच्या गाडीत माती भरून त्यावर रहिवाशी संस्थेमधील कचरा टाकून प्रशासनाच्या डोळ्यात धुळफेक करण्याचे काम पालिका हद्दीत घणकचर्याची वाहतूक करण्यासाठी नेमण्यात आलेला कंत्राटदार करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शेकाप विधानसभा उपाध्यक्ष अजित अडसूळे यांनी या बाबत पालिका अधिकार्यांकडे तक्रार केली असून, अडसूळे यांच्या तक्रारारीची दखल घेत योग्य ती कार्यवाही करण्याचे संकेत अधिकार्यांनी दिले आहेत.
पनवेल पालिका हद्दीत दररोज तयार होणार्या घनकचर्याची वाहतूक करण्यासाठी पालिका प्रशासनाने 54 घंटा गाड्या तसेच 15 कोपॅक्टरची खरेदी केली आहे. या वाहनांची देखभाल आणि वाहतूक करण्यासाठी प्रशासना मार्फत नोव्हेंबर 2023 रोजी नव्या कंत्राटदाराची नेमणूक केली आहे. पालिका हद्दीत दररोज 400 ते साडेचारशे टन घण कचरा निर्माण होत असून, या कचर्याची वाहतूक आणि विल्हेवाट लावण्यासाठी प्रसासना मार्फत कंत्राटदार कंपनीला प्रति टन 2 हजार एकशे 99 इतका दर देण्यात येतो. याचाच फायदा उचलण्यासाठी कंत्राटदाराने नेमलेली माणसे पालिका हद्दीत रस्त्या कडेला जमा केलेली माती घंटागाडीत भरत असल्याचे पाहायला मिळत आहे. मातीमुळे कचर्याचे वजन वाढत असल्याने माती मिश्रित कचरा भरूण कंत्राटदार कंपनी पालिकेची आर्थिक फसवणूक करत असल्याचा आरोप अडसूळे यांनी केला आहे.
सफाई दरम्यान रस्त्यावर गोळा होणार्या मातीची वाहतूक कंत्राटदार करत असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. यापुढे असे प्रकार घडू नये याकरता योग्य उपाय योजना राबवण्याच्या सूचना कंत्राट दाराला करण्यात येणार आहेत.
वैभव विधाते,
उपायुक्त पनवेल पालिका