उरणच्या रस्त्यावर धुळीचे लोट

| उरण । वार्ताहर ।
पावसाळ्यात पडलेल्या खड्ड्यातील पाणी सुकून रस्त्यावर त्याची धूळ निर्माण होत असल्याने उरणच्या रस्त्यांवर धुळींचे लोट पसरू लागेल आहेत. त्यामुळे वाहन चालक व प्रवाश्यांना धुळीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. उरणमधील राष्ट्रीय, राज्य व गावांना जोडणार्‍या रस्त्यांवर पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते.

हे खड्डे बुजविण्यासाठी टाकण्यात आलेली खडी, सिमेंट आणि तर काही खड्डे चक्क मातीने भरण्यात आले होते. त्यामुळे खड्डयात पाणी सुकल्याने त्याची धूळ निर्माण होऊ लागली आहे. या खड्ड्यातून वेगाने वाहने जात असतांना धूळ निर्माण होत आहे. दुचाकीवरून तसेच एस. टी. व एन एम एम टी या सार्वजनिक वाहनातून प्रवास करणार्‍या प्रवाशांना या धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे.

श्‍वसनाच्या आजाराची भिती
यामध्ये उरण पनवेल मार्ग, जासई ते गव्हाण, खोपटा कोप्रोली मार्ग,दास्तान ते दिघोडे आदी मार्गावर धुळींचे लोट निर्माण होत आहेत. त्यामुळे प्रवासी व वाहन चालकांना श्‍वसनाच्या आजार जडण्याची शक्यता आहे.

Exit mobile version