डोपिंगमध्ये सापडलेल्या दुतीचे राज्यकर्त्यांना साकडे

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

आशियाई स्पर्धेत दोनवेळा रौप्य पदक पटाकावणारी भारताची धावपटू दुती चंदवर उत्येजक द्रव्य सेवन चाचणीत दोषी आढळल्यावर चार वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. यानंतर दुती चंदने या प्रकरणात ओडिसा राज्य सरकार आणि केंद्र सरकारने आपली मदत करावी अशी विनंती केली आहे. राष्ट्रीय उत्येजक द्रव्य विरोधी संस्थेने चंदवर चार वर्षाची बंदी घातली आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात दोन डोपिंग टेस्टमध्ये चंदच्या रक्ताच्या नमुन्यात बंदी असलेलं उत्येजक द्रव्य सापडले होते. त्यानंतर तिच्यावर बंदीची कारवाई करण्यात आली.

या कारवाईनंतर दुती चंदने एएनआयला प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, ममला बंदीची बातमी काल सकाळी कळाली. मी निर्णयाला आव्हान दिलेली केस हरली आणि माझ्यावर चार वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. मला या निर्णयामुळे धक्का बसला तसेच खूप दुःख देखील झाले.फ ममी यापूर्वी देखील अनेक डोपिंग टेस्ट दिल्या आहेत. यापूर्वी असं कधीच झालं नव्हतं. मी राज्य आणि केंद्र सरकारला तसेच नाडाला मदतीसाठी विनंती केली आहे. मला विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी मदत करण्यात यावी अशी विनंती मी केली आहे. मी कोणतेही गैरकृत्य केलेले नाही.फअसे तिने सांगितले. नाडाने घातलेली बंदी ही या वर्षी 3 जानेवारी पासून लागू होणार आहे. दुतीच्या रक्ताचे नमुने हे 5 डिसेंबरला घेण्यात आले होते. या काळात पात्र झालेल्या स्पर्धांमधून तिला अपात्र करण्यात आले आहे. तिने मिळवलेली सर्व पदके, गुण आणि बक्षीसं देखील काढून घेण्यात येणार आहे.

Exit mobile version