नागांवमध्ये ई-पीक पाहणी प्रात्यक्षिक कार्यशाळा

। अलिबाग । प्रतिनिधी ।
नागाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शुक्रवारी (दि.20) सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत सभागृहात ई- पीक पाहणी कार्यक्रमाअंतर्गत अँड्रॉइड मोबाईलवर ई -पीक पाहणी अ‍ॅप डाउनलोड कसा करावा व त्याचा वापर याबाबत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

या प्रशिक्षणास सरपंच निखिल मयेकर, अलिबाग तालुका प्रांत ढगे, मंडळ अधिकारी पुंडलिक मोकल, तलाठी उदयसिंह देशमुख, ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत आठवले, सुरेंद्र नागलेकर, हर्षदा मयेकर, परेश ठाकूर, शौकीन राणे व ग्रामपंचायत हद्दीतील अनेक शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.

या प्रशिक्षणात शेतकरी वर्गाला प्रशिक्षणासह अलिबाग तालुका प्रांत ढगे यांनी विशेष मार्गदर्शन केले. तसेच ई-पीक पाहणी अ‍ॅपचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.

Exit mobile version