| शिहू । वार्ताहर ।
जिल्हाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.14 डिसेंबर रोजी रिलायन्स टाऊनशिप येथे एक दिवशीय ई-चावडी, ई-फेरफार व ई – हक्क प्रणाली जिल्हास्तरीय प्रशिक्षण राज्य संचालक ई-फेरफार प्रकल्प जमावबंदी आयुक्त कार्यालय पुणे, सरिता नरके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या वेळीस जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव, निवासी उपजिल्हाधिकारी रायगड पदमश्री बैनाडे यांनी उपस्थित अधिकार्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणासाठी जिल्हातील सर्व तहसीलदार, नायब तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, मंडळ अधिकारी,तलाठी उपस्थिती होते. या वेळी ई-चावडी प्रणालीत सदर नमुना कसा विकसित करण्यात येत आहे याची माहिती ई -फेरफार प्रकल्पातून या नमुन्यासाठी घेण्यात येणारी माहिती, ई-चावडी प्रकल्पात करावयाच्या डेटा एन्ट्री बाबतची माहिती, तसेच सदर नमुन्यासाठी आवश्यक मोहीम स्वरूपात करावयाची कार्यवाही, ई-प्रकल्पाशी संबंधित मंडळ अधिकारी दप्तर,तालुका नमुने, जिल्हा नमुने विकसित करणे तलाठ्यांनी दप्तर अदययावतीकरण बाबत शासन स्तरावर एकसमान भाग निहाय कार्यवाही बाबत सूचना याची सविस्तर माहिती सरिता नरके यांनी देऊन उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले.