ई-शिक्षण काळाची गरज- डॉ. कासकर

| खांब | वार्ताहर |

जो शिकेल तोच टिकेल असे माझे गुरु नेहमीच बोलत असतात. मीदेखील ग्रामीण भागातील उर्दू शाळेतील विद्यार्थी आहे. केवळ इंग्रजी माध्यमिक शाळेत शिक्षण घेणारी मुले आपला नावलौकिक करतात असे नव्हे तर, उर्दू आणि मराठी माध्यमिक शाळेत शिक्षण घेणारी मुलेदेखील उच्च शिक्षण घेऊन स्वतःचे, आई-बाबा व आपल्या गावाचे नाव उज्ज्वल करतात. अर्थातच उच्च शिकणासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला मेहनत घ्यावी लागेल. असे सांगत बदलत्या युगात ई-शिक्षण काळजी गरज असल्याचे मत साई फाऊंडेशन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. असिफ कासकर यांनी व्यक्त केले आहे.

रोहा न.प. अष्टमी उर्दू शालेय विद्यार्थ्यांसाठी साई चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. असिफ कासकर यांच्यावतीने एलईडी टीव्ही भेट देण्यात आली. यानिमित्ताने अष्टमी उर्दू शाळेत आयोजित कार्यक्रमप्रसंगी जामे मस्जिद ट्रस्ट अष्टमीचे अध्यक्ष शफी पानसरे, उपाध्यक्ष मुबीन दळवी, खजिनदार अफसर करजिकर,माजी अध्यक्ष बाकर साष्टीकर, जमीर करजिकर, ट्रस्टी नजीर खान, इरफान दर्जी, मन्सूर दर्जी, बशीर मिटकर, अजीम नाडकर, अहमद नाडकर, मुख्याध्यापिका जबीन वलीले, रुबीना गंगरेकर, शिक्षक वसीम सावरटकर आदी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version