दिव्यांगास राजिपकडून ई-रिक्षा

| रसायनी | प्रतिनिधी |

रसायनीतील काळणवाडी येथील रमाकांत मोतीराम मांडे यांना दिव्यांग कल्याण विभाग रायगड जिल्हा परिषद, अलिबाग यांच्यावतीने ई-रिक्षा मिळाली. ती मोहोपाडा ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरपंच उमा मुंढे यांच्या हस्ते देण्यात आली. रमाकांत मांडे यांना ई-रिक्षा मिळाल्याने त्यांना स्वयंरोजगार प्राप्त करता येणार आहे. त्यांना रायगड जिल्हा परिषदेकडून ई-रिक्षा मिळाल्याने रमाकांत मांडे यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच, सर्व सदस्य, सदस्या, ग्रामपंचायत अधिकारी वैभव पाटील, ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version