| नेरळ | प्रतिनिधी |
पुढील काळात तीन महिन्यांसाठी ई-वाहने माथेरानच्या रस्त्यावर चाचणी घेण्यासाठी चालविली जाणार आहेत. न्यायलायाच्या निर्णयानंतर माथेरान पालिकेने पाच रिक्षा खरेदी करण्याचे आदेश दिले असून, ऑक्टोबर महिन्यापासून ई-वाहने माथेरानच्या रस्त्यावर धावताना दिसणार आहेत. त्यामुळे या रिक्षांना माथेरान व्यापारी संघटनेकडून सहमती दर्शविली आहे. दरम्यान, ई-रिक्षा तात्काळ सुरु व्हावी याकरिता माथेरान व्यापारी संघटना पाठिंबा देण्यासाठी पालिकेवर धडकणार आहेत.
दरम्यान, तात्काळ ई-रिक्षा सुरू करण्यात याव्या याकरिता माथेरानमधील स्थानिक व्यापारी संघटनेच्या वतीने ई-रिक्षाला सहमती देण्यासाठी माथेरानमधील खान हॉटेल येथे बैठक घेतली. माथेरान स्थानिक व्यापारी संघटनेच्या वतीने व्यापार्यांची चर्चासत्र सभा घेण्यात आली असता सर्व व्यापार्यांच्या एकमताने सहमताने रिक्षा चालू व्हावी याकरिता समर्थन करण्यात देण्यात आले. ई-रिक्षा लवकरात लवकर चालू व्हावी यासाठी व्यापारी मंडळांनी सहमती देत ई-रिक्षा चालू होण्यास जाहीर पाठिंबा दिला असून, त्यासाठी माथेरान अध्यक्ष कार्यालयासह माथेरान नगरपरिषद येथे जाहीर मोर्चाचे आयोजन केले आहे.
3 ऑक्टोबर रोजी हुतात्मा भाई कोतवाल हुतात्मा स्मारक येथून माथेरान महसूल अधीक्षक कार्यालय आणि माथेरान नगर परिषदेवर पाठिंबा मोर्चा काढणार आहेत. व्यापार्यांच्या सभेत मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेश चौधरी यांनी केले होते. व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माथेरान हात रिक्षा संघटनेचे अध्यक्ष शकील पटेल, याचिकाकर्ते सुनील शिंदे, व्यापारी कुलदीप जाधव, शिवाजी शिंदे, योगेश जाधव, दिनेश सुतार, हेमंत पवार, नितेश कदम, गिरीष पवार, राकेश चौधरी यांनी आपले विचार मांडले.