| माथेरान | प्रतिनिधी |
माथेरानमधील ई-रिक्षा वाढीसाठी रिक्षा संघटनेने शासनाच्या धोरणाचा निषेध म्हणून जाहीर बेमुदत ई-रिक्षा बंदचे आंदोलन पुकारले होते. मात्र, हे आंदोलन तुर्तास मागे घेण्याचा निर्णय घेतला असून मंगळवारी (दि.10) ई-रिक्षा पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत.
माथेरानमधील 94 परवाना धारक हात रिक्षाचालकांना सरसकट ई-रिक्षा चालविण्याचा परवाना मिळावा याकरिता श्रमिक हातरिक्षा चालक-मालक संघटनेने मंगळवारपासून बेमुदत रिक्षा बंदचा इशारा दिला होता. त्यानुसार सकाळपासून ई-रिक्षा बंद ठेवण्यात आल्या होत्या. परंतु; नगरपालिकेमध्ये माथेरानचे नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी एक विशेष बैठक रिक्षा संघटनेबरोबर घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, गुरूवारी (दि.12) सनियंत्रण समितीची बैठक होत असून त्यामध्ये ई-रिक्षावाढी संदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे हा बंद तूर्तास मागे घेण्याची विनंती त्यांनी केली होती. त्यांच्या विनंतीला मान देताना रिक्षा संघटनेने 12 तारखेपर्यंत निर्णय होईपर्यंत हा बंद मागे घेतला असून मंगळवारी संध्याकाळी ई-रिक्षा पुर्ववत सुरू करण्यात आल्या आहेत.
ई-रिक्षा बंदला तुर्तास स्थगिती
