पायलट प्रोजेक्टनंतरही ई-रिक्षा कायम धावणार- राहुल इंगळे

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 36;

। माथेरान । वार्ताहर ।

डिसेंबरमध्ये ई-रिक्षाच्या पायलट प्रोजेक्टला सहा महिने पूर्ण होत असून ह्यानंतर ही सेवा बंद होणार असल्याच्या अफवांना पेव आला होता. त्यासाठी सर्व ई-रिक्षा चालकांनी मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या दालनात बैठक घेऊन याबाबत सविस्तर माहिती घेतली. सुप्रीम कोर्टाने सनियंत्रण समितीकडे या प्रोजेक्टबाबत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. सहा महिन्यांपूर्वी हा पायलट प्रोजेक्ट सुरू करताना माथेरानमधील रस्त्यावर ई-रिक्षा तीनही ऋतूत चालू शकतात का यासाठी हा पायलट प्रोजेक्ट कार्यान्वित करण्यात आला होता आणि तो प्रोजेक्ट या डिसेंबरमध्ये पूर्ण होत आहे. मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी ई-रिक्षा सेवा सुरळीत सुरू राहील याची ग्वाही दिली.

सनियंत्रण समितीने 20 परवानाधारक हात रिक्षा चालकांना ई-रिक्षाची परवानगी दिली त्यांनी 10 जूनपासून ई-रिक्षा सेवा सुरू केली. यावर्षी मोठ्या प्रमाणात माथेरानला पाऊस झाला 6550 मिमी इतका मुसळधार पावसातदेखील ई-रिक्षा बंद न पडता सुरळीत चालल्या या 20 हात रिक्षा चालकांनी बँकेतून कर्ज काढून ई-रिक्षा विकत घेतल्या आहेत. त्यामुळे दरमहिना कर्जाचे हफ्ते भरावे लागतात. मुख्याधिकारी यांच्या भेटीत गावातील लोकप्रतिनिधी व स्थानिक मोठया प्रमाणात उपस्थित होते. रिक्षा संघटनेचे सचिव सुनिल शिंदे यांनी सहा महिन्याचा ई-रिक्षा सेवेची सविस्तर माहिती दिली.

86834 प्रवाशांनी ई-रिक्षा मधून प्रवास केला दररोज 284 विद्यार्थी व 23 शिक्षक याना ई-रिक्षाची सेवा दिली जाते. 137 रुग्णांना बी जे हॉस्पिटलमध्ये जाण्यास सेवा दिली आहे. नागेश कदम व रुपेश गायकवाड यांनी उर्वरित 74 हात रिक्षा चालकांना ई-रिक्षाची परवानगी देण्याची मागणी केली. हात रिक्षाच्या अमानवीय प्रथेतून मुक्ती हाच श्रमिक रिक्षा संघटनेचा उद्देश असल्याचे स्पष्ट केले. माजी नगरसेवक शिवाजी शिंदे, प्रदीप घावरे, प्रतिभा घावरे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेश चौधरी, कुलदीप जाधव यांनी चर्चेत भाग घेतला व ई-रिक्षांची संख्या वाढविण्याची मागणी केली. तसेच ई-रिक्षा सेवा चोवीस तास उपलब्ध केली जावी ही देखील प्रमुख मागणी केली. शिवसेना शाखा प्रमुख चंद्रकांत चौधरी , दत्ता सनगरे, चंद्रकांत जाधव, शैलेंद्र दळवी, प्रकाश सुतार, सुहासिनी दाभेकर, अर्चना बिरामने, प्रीती कळंबे आदी उपस्थित होते.

Exit mobile version