रोह्यातील ई कचरा होणार संकलन

। रोहा । प्रतिनिधी ।
इलेक्ट्रॉनिक वस्तू, संगणक, मोबाईल्स यासारख्या आधुनिक जीवनशैलीची गरज बनलेल्या वस्तूंमुळे पर्यावरणाच्या समस्या वाढत आहेत. यातील सर्वात मोठी समस्या आहे ती ई-कचर्‍याची. बिघडलेले किंवा खराब झालेले मोबाइल फोन्स, लॅपटॉप, टेलिव्हिजन संच, आणि कॉम्प्युटर्स यांसारख्या वस्तूंमुळे आरोग्य आणि पर्यावरणाच्या समस्या निर्माण होत आहेत. ही समस्या लक्षात घेऊन रोटरी क्लब 3131 व रोटरी क्लब रोहा यांनी गुरुवारी (दि.24) संध्याकाळी 5 ते 7 यावेळेत ई कचरा संकलन मोहीम हाती घेतली आहे. रोह्यात परांजपे सदन, मिलन शाह यांचे कार्यालय, साई मंदिर, जयेश मोटर्स व हरी ओम लॅब या ठिकाणी ई कचरा संकलन करण्यात येणार आहे. ई कचरा संकलन मोहिमेत सहभागी होऊन नागरिकांनी पर्यावरण संवर्धन मोहिमेत योगदान द्यावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Exit mobile version