ट्विट करा अन् भरघोस पैसे कमवा…


योगींच्या समर्थनार्थ प्रति ट्विट 2 रुपये? चर्चित ऑडिओ क्लिप प्रकरण जोरात…
। लखनऊ । वृत्तसंस्था ।
उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कथित टूलकिट प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झालीय. या टूलकिटमध्ये एक ऑडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या समर्थनार्थ ट्विट करण्यासाठी 2 रुपये दिले जात असल्याचा उल्लेख आहे. मुख्यमंत्र्यांसाठी सोशल मीडिया सांभाळणार्‍या एका स्पेशल टीममधील सदस्यांची ही कथित ऑडिओ क्लीप असल्याचं म्हटलं जातंय. या कथित मफेकफ ऑडिओ क्लीप प्रकरणी उत्तर प्रदेशात अटकसत्र सुरू झालं. कानपूर पोलिसांनी रविवारी आशिष पांडे, हिमांशु सैनी यांना अटक केली होती. या दोघांवर कट रचणं तसंच फसवणुकीचा आरोप ठेवण्यात आला.

आरोपी गजाआड
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले आशिष पांडे हे सोशल मीडिया मॅनेजमेंटशी निगडीत एका कंपनीत काम करतात. पांडे हे राज्य सरकार आणि मुख्यमंत्री कार्यालय यांचं सोशल मीडिया अकाऊंट सांभाळणार्‍या टीमचा एक भाग होते, अशी माहिती मिळतेय. पांडे यांच्या अटकेबद्दल अद्याप सरकार किंवा मुख्यमंत्री कार्यालयाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Exit mobile version