| मुंबई | वृत्तसंस्था |
भाजपाच्या नेतृत्वाखाली सध्याची एनडीए ही नौटंकी आहे. इंडिया आघाडी निर्माण झाली त्यानंतर त्यांना एनडीएची आठवण झाली. मग त्यांनी लोक गोळा केले व दिल्लीत एनडीए म्हणून बैठक घेतली. कोण आहेत एनडीएमध्ये? शिवसेना, अकाली दल नसेल तर ती एनडीए शून्य आहे. एनडीएची ताकदच शिवसेना व अकाली दल होती. बाकीचे लोक येतात आणि जातात. 2024च्या आधी भाजपाही फुटलेला असेल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
सनातन धर्म हा निवडणुकीतील मुद्दा असू शकत नाही. आगामी लोकसभेसाठी भाजपकडे कोणताही मुद्दा नाही. महागाई, बेरोजगारी, चीनचे आक्रमण, जम्मू-काश्मीर, अंतर्गत सुरक्षा, कॅनडा हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. सनातन धर्मवरच बोलत आहे. जेव्हा आम्ही इंडिया म्हणून एकत्र आलो तेव्हा त्यांना जाग आली. तोपर्यंत अकेला मोदी काफी है हेच चालू होते. इंडिया निर्माण झाल्यावर आणखीही पक्ष हवेत, ही भावना जागी झाली, असे संजय राऊत म्हणाले.