। माणगाव । प्रतिनिधी ।
हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, महाड महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सहज योग ध्यान कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते.
या कार्यक्रमांतर्गत इंटरनॅशनल सहज योग रिसर्च सेंटरचे प्रतिनिधी नितीन जिंदल यांनी विद्यार्थ्यांना सहज योग ध्यानाच्या तंत्राबद्दल मार्गदर्शन केले. सहज योगाचा अभ्यास हा तणाव कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी पद्धती म्हणून ओळखला जातो. आधुनिक समाजासाठी सहज योग ध्यान अत्यंत फायदेशीर आहे, असे मार्गदर्शन जिंदल यांनी व्याख्यानातून विद्यार्थ्यांना केले. हा कार्यक्रम राबविण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष किशोर धारिया व संचालिका सोनाली धारिया यांच्यासह महाविद्यालयाच्या प्रमुख सल्लागार डॉ. संध्या कुलकर्णी व प्राचार्य सुदेश कदम यांनी प्रोत्साहन दिले.