| आंबेत | वार्ताहर |
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीची महायुती असताना दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता खा. सुनील तटकरे युतीचा धर्म पाळत नाहीत, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष तुकाराम पाटील यांनी केला आहे. फक्त राष्ट्रवादीच्या लावाजमासोबत सरसकट विविध खात्याची कामे, भूमीपूजन व उद्घाटनाचे काम खा. तटकरे म्हसळा तालुक्यात राबवित असल्यामुळे महायुतीचे कार्यकर्ते नाराज असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते नुकतेच शासकीय विश्रामगृहाचे भूमिपूजन झाले. परंतु, त्याआधी खा सुनील तटकरे यांनी शासकीय सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे असणार्या कामांचे भूमिपूजन (दि.3 ) मार्च रोजी केले. का केले त्यांनाच माहीत? आम्हाला वाटते की, तीन पक्षांची युती आहे; परंतु तटकरे यांना श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात हे मान्य नसेल, असे वाटतंय म्हणून त्यांचा श्रेय घेण्याचा कार्यक्रम चालू आहे, असा आरोपसुद्धा पाटील यांनी केला. खा. तटकरे युतीचा धर्म पाळत नसल्याने लवकरच वरिष्ठांजवळ चर्चा करणार असल्याचे पाटील यांनी पुढे बोलताना सांगितले.