मुश्रीफांवर ईडीची कारवाई

कागल, पुणे येथे छापेमारी
| कोल्हापूर | प्रतिनिधी |
राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापे मारले आहेत. अप्पासाहेब नलवडे साखर कारखानाप्रकरणी मुश्रीफ यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली आहे. कारखानातल्या 100 कोटी घोटाळ्याचा आरोप मुश्रीफ यांच्यावर करण्यात आला आहे. किरीट सोमय्या यांनी काही महिन्यांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन हसन मुश्रीफ यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप केले होते. 2020 साली कोणत्याही पद्धतीने पारदर्शक व्यवहार न होता आप्पासाहेब नलावडे साखर कारखाना ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला चालवण्यासाठी दिला गेला.

या कंपनीला साखर कारखाना चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता. तरीही या कंपनीला कंत्राट का दिले? हसन मुश्रीफांचे जावई या कंपनीचे मालक असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. दरम्यान, या छापेमारीनंतर कागलमध्ये मुश्रीफ समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करीत संताप व्यक्त केला.या पार्श्‍वभूमीवर मुश्रीफ यांनीही पत्रकार परिषद घेऊन विशिष्ट जातीच्या नेत्यांवर सुडबुद्धीने कारवाई केली जात असल्याचा आरोप भाजपवर केला.

Exit mobile version