ईडीची टीम रायगडमध्ये दाखल; कुठे सुरु आहे धाडसत्र?

दिल्लीतून थेट 20 जणांची टीम करणार कारवाई; मुंबईतील कर्मचारी करणार सहकार्य
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना यापुर्वीच ईडीकडून अटक करण्यात आली आहे. हा तब्बल 1 हजार 34 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचे समोर आल्यानंतर तसेच प्रविण राऊत यांनी दिलेल्या कबुलीत अन्य धागेदोरे ईडीच्या हाती लागले आहेत. त्यामुळे थेट दिल्लीतून ईडीची 20 जणांची टीम रायगड व ठाणे भागात दाखल झाली असून त्यांनी धाडसत्र सुरु केले आहे. त्यांच्या मदतीला मुंबई ईडी कार्यालयातील कर्मचारी मदतीला दिले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात नेमक्या कोणत्या ठिकाणी ईडीने कारवाई केली, याबाबत माहिती हाती आली नसली तरी अलिबाग तालुक्यातील नांदईपाडा येथे संजय राऊत यांची जागा असून नागरिकांमध्ये त्या ठिकाणी कारवाई झाल्याची चर्चा सुरु आहे.

एचडीआयएल या रिअल इस्टेट कंपनीद्वारे पत्राचाळ जमीन घोटाळ्यामध्ये तब्बल 1 हजार 34 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे समोर आले होते. याप्रकरणी ईडीकडून चौकशी करण्यात येत होती. दरम्यान अनेकांनी ईडीकडून चौकशी करण्यात आली होती.

या प्रकरणात अटक झालेले प्रवीण राऊत हे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या जवळचे असल्याचे मानले जाते. कारण प्रवीण राऊत यांच्या पत्नीच्या खात्यातून संजय राऊत यांच्या पत्नीच्या बँक खात्यात 50 लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते. याचे पुरावे देखील ईडीला मिळाले होते. यानंतर त्यांना देखील समन्स पाठवण्यात आले होते. 1,034 कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्यात प्रवीण राऊत यांना यापूर्वी देखील अटक झाली होती. प्रवीण राऊत यांनी खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना 55 लाख रुपये दिले होते. पण ईडीच्या चौकशीत वर्षा राऊत यांनी आपण हे पैसै कर्ज म्हणून घेतले होते, असा दावा केला होता.

Exit mobile version