शिवसेना नेते अडसुळांवर ईडीचा ससेमिरा

धाड पडताच गाठले हॉस्पिटल
मुंबई | प्रतिनिधी |
शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्याव ईडीने धाड टाकली आहे.सिटी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. आमदार रवी राणा यांनी ईडीकडे सिटी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडे अडसूळांविरोधात तक्रार दिलेली होती.
नियोजित असलेल्या कार्यक्रमांमुळे चौकशीला हजर राहू शकत नसल्याचे अडसुळांनी स्पष्ट केले होते. मात्र मुंबइईतील कांदिवली पूर्वमधील त्यांच्या घरात ईडीचे पथक दाखल झाले. या वेळी आनंदराव अडसूळ यांची तब्येत बिघडली. त्यांना स्ट्रेचरवरुन रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
आनंदराव अडसूळ यांना कुठल्याही प्रकारची अटक झालेली नाही. ही रवी राणा यांनी पेरलेली माहिती आहे, असं आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांनी स्पष्ट केले होते.

Exit mobile version