| मुंबई | प्रतिनिधी |
एसटी बँकेच्या बैठकीमध्ये सदावर्ते गट आणि शिवसेना शिंदे गटाचे अडसूळ यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला आहे. या बैठकीच्या दरम्यान दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यामध्ये चार ते पाच संचालक जखमी झाल्याची माहिती आहे. या दोन्ही गटाचा वाद आता नागपाडा पोलीस ठाण्यात पोहोचला असून, एकमेकांविरोधात तक्रारी देण्यात आल्या आहेत.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी बँकेची मिटिंग बोलवण्यात आली होती. त्यामध्ये दिवाळी बोनस वाटपाची चर्चा करण्यात आली. याच मुद्द्यावरून सदावर्ते गट आणि अडसूळ गट यांच्यामध्ये मतभेद झाले आणि नंतर त्याचे रुपांतर हाणामारीमध्ये झालं. एसटी बँकेच्या संचालकांच्या बैठकीमध्ये बाहेरुन आलेली माणसे बसवण्यात आल्याचा आरोप अडसूळ गटाकडून करण्यात येत आहे.







