| अलिबाग | वार्ताहर |
तालुक्यातील परहूरपाडा केंद्राची शिक्षण परिषद राजिप शाळा मापगाव येथे शुक्रवार, दि. 25 ऑगस्ट रोजी पार पडली. केंद्रप्रमुख अनिषा पाटील यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर चरी व कोपर शाळेचे स्पर्धेतील यशाबद्दल अभिनंदन करण्यात आले. त्यानंतर पुस्तकातील कोऱ्या पानांचा उपयोग कसा करायचा, यावर शिक्षिका कुंदा पाटील यांनी मार्गदर्शन केले. दर्जेदार व्हिडिओ निर्मिती कशी करायची, यावर पूजा पाटील यांनी मार्गदर्शन केले.
या शिक्षण परिषदेस गटशिक्षणाधिकारी श्री. पिंगळा यांनी भेट देऊन शिक्षकांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्यासोबत सानध व्यक्ती रवींद्र वर्तक होते. विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास, सर्व चाचण्या तसेच शाळाबाह्य सर्व्हेक्षण, निरक्षर सर्वेक्षण, नवीन परिपत्रके यावर चर्चा झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचाल श्री. मोकल यांनी, तर सभेची सांगता श्री. गुरव यांनी आभार मानून केली.