| तळे | वार्ताहर |
जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे दुर्लक्ष न करता चिकाटीने व जिद्दीने अभ्यास करून यश प्राप्त करावे असे प्रतिपादन तळे विभाग शि. प्र. मंडळाचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम मुळे यांनी व्यक्त केले. श्रमजीवी फाउंडेशन मुंबई व साने गुरुजी बालभवन वाचनालय बापट आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व प्राथमिक व हायस्कूल शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.
श्रमजीवी फाऊंडेशनचे संस्थापक हरेश कावणकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास कार्यवाहक सुरेश शिगवण, मिलिंद खारपाटील, महेश जावळे, आनंद घाटे,शंकर बेटकर, सोनवणे सर, शेख सर, अनंत तालीम, नजीर भाई, श्री मोहिते, योगेश पाटील, मिथू आंधले, प्रमोद बेटकर, कासिम भाई , केंद्रप्रमुख सावंत, प्रवीण ठोंबरे, येलवे,जयसिंग बेटकर यांच्यासह ग्रामस्थ, महिला व विद्यार्थी उपस्थित होते.
केंद्रप्रमुख सावंत यांनी देखील विद्यार्थ्यांना मौलिक सल्ला दिला. यावेळी हरीश कावणकर, सुरेश शिगवण, पुरुषोत्तम मुळे, मिलिंद खारपाटील, महेश जावळे, आनंद घाटे, शंकर बेटकर, जयसिंग बेटकर व अन्य मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप व इयत्ता दहावी इयत्ता बारावीमधील विद्यार्थ्यांचे प्रमाण पत्र भेटवस्तू व गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले. यावेळी हरीश कावणकर यांनी फाऊंडेशनच्या कार्याचा आढावा घेतला. सूत्रसंचालन गंमरे सर यांनी केले तर आभार जयसिंग बेटकर यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन जयसिंग बेटकर व सहकारी शिक्षक यांच्या संकल्पनेतून भापट या ग्रामीण विभागात करण्यात आले होते.