| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
कर्जत पोसरी गावातील केतन थोरवे या तरुणाने ट्रेन खाली जाणाऱ्या वयोवृद्ध इसमाचे प्राण वाचवण्याची कामगिरी केली आहे. केतन थोरवे याच्या या अतुलनीय कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
कर्जत रेल्वे स्टेशन मधून सुटत असलेल्या ट्रेन खाली घसरून एक वयो वृध्द इसम ट्रेन खाली जात होता. मागच्याच डब्यात असलेल्या केतन थोरवे याच्या ही गोष्ट लक्षात येताच त्याने शिताफीने धाव घेत त्या इसमाला खेचून बाहेर काढत त्याचे प्राण वाचवले.