। नेरळ । प्रतिनिधी ।
विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दीष्ट शासनाने जाहीर केले असून त्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्याकडून शाळांमध्ये लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली होती.
नेरळ विद्यामंदिर, विद्या विकास मंदिर या शाळांमध्ये आरोग्य केंद्राकडून शालेय विद्यार्थ्यांना ही लस देण्यात आली. वैद्यकीय अधिकारी डॉ. पवार यांनी नेरळ विद्यामंदिर शाळेत तर डॉ सोनेगरा यांनी विद्या विकास मंदिर या शाळेत लसीकरण शिबिर यशस्वी केले. नेरळ विद्यामंदिर मध्ये आरोग्यसेविका घोडके, भोंगाडे, आरोग्यसेवक कांबळे, राठोड यांनी लसीकरण करून घेतले. कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक पी. बी. विचवे, उपमुख्याध्यापक यांनी आरोग्य विभागाच्या स्टाफला मदत केली.
नेरळ येथील विद्या विकास मंदिर शाळेत आरोग्य विभागाचे आरोग्यसेविका नगराळे, टोपले तसेच आरोग्यसेवक कवळे, नवाले यांनी सहकार्य केले. यावेळी मुख्याध्यापिका शैलजा निकम, मुख्याध्यापक विनया काकडे तसेच अन्य शिक्षक वर्गाने विद्यार्थ्यांचे लसीकरण करून घेण्यासाठी आरोग्य विभागाला मदत केली. आरोग्य केंद्रातील सुनील चव्हाण आणि पुंजारा यांनी नियोजनात सहभाग घेऊन लसीकरण शिबिरे यशस्वी केले.या शिबिरासाठी युनायटेड वे च्या कार्यकर्त्यांनीही मदत केली.