आर्थिक साक्षरतेसाठी शिक्षण महत्वाचे – न्या. प्रतिक लंबे

। श्रीवर्धन । वार्ताहर ।
गरीबातील गरीब मुलाने आज योग्य शिक्षण घेतल तर त्या शिक्षणाने स्वत:ची प्रगति करून आपल्या कुटुंबाला सुद्धा आर्थिक उन्नतीकडे जगण्यातून दिशा देवू शकतो. त्यामुळे आर्थिक साक्षरतेसाठी शिक्षण महत्वाचे असल्याचे मत श्रीवर्धन येथील दिवाणी न्यायाधीश प्रतीक लांबे यांनी व्यक्त केले. ते वडवली येथील आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
वडवली येथील सहकार्य सामाजिक शिक्षण संस्थेच्या डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम वाचनालयामध्ये बँक योजना-माहिती तसेच शिक्षणाचे महत्त्व या विषयांवर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला होता. श्रीवर्धन तालुका विधी सेवा समिती श्रीवर्धन आणि म्हसळा-श्रीवर्धन वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बँक ऑफ इंडिया शाखा हरिहरेश्‍वर शाखा व्यवस्थापक सुधीर गायकवाड यांनी बँक मार्फत दिल्या जाणार्‍या शेतकरी, महिला बचत गट, सामान्य व्यक्ती यांना उपयुक्त विविध कर्जाच्या योजनांची, तसेच शासकीय विमा योजनांची सविस्तर व उत्तम माहिती दिली. अ‍ॅड.विठोबा पाटील यांनी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकार कायदा व शिक्षणाचे महत्त्व या विषयांवर मार्गदर्शन केले.
या प्रसंगी सरपंच प्रियंका नाक्ती, आगरी समाज प्रभारी अध्यक्ष किशोर बिराडी, विस्तार अधिकारी नागे, बचतगट अधिकारी गोरटे, शैलेश चांदोरकर, बँक अधिकारी पळधे व वडवली ग्रामस्थ बंधू व भगिनी उपस्थित होते.

Exit mobile version