। श्रीवर्धन । वार्ताहर ।
ग्राहकांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना व सायबर गुन्ह्यांबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा श्रीवर्धन येथे महाग्राहक परिचर्चेचे आयोजन करण्यात आले होते. अज्ञात व्यक्तींकडून बँक खात्याची ऑनलाईन माहिती घेऊन बँक ग्राहकांची लाखोवारी आर्थिक फसवणूक झालेली आहे. ग्राहकांना योग्य माहिती देऊन क्रेडिट कार्ड, ए.टी.एम.कार्ड बाबतीत, ऑनलाईन खरेदीचे आमिष दाखवून फसवणे या बाबतीत महाग्राहक परिचर्चा आयोजित कार्यक्रमा दरम्यान ग्राहकांना माहिती देण्यात आली. यावेळी पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक सुरेश माने यांनी सांगितले की लॉटरी, ऑफर, बक्षीस अशा मेसेजना प्रतिसाद देऊ नका. अनेकजणांची याप्रकारे फसवणूक झालेली आहे. ग्राहकांनी योग्य ती काळजी घ्यावी असा सल्ला दिला.