कर्जतमध्ये शिक्षणाचा बाजार

शिक्षण संस्थांकडून डोनेशनच्या नावाखाली लुटमार
अ‍ॅड. कैलास मोरे यांचा आरोप

| कर्जत | प्रतिनिधी |

कर्जतमध्ये दरवर्षी विदयार्थ्यांकडुन अ‍ॅडमिशन, इमारत निधी, डोनेशनच्या माध्यमातून सुमारे 100 कोटींची लुटमार केली जात आहे, असा आरोप सम्यक विद्यार्थी आंदोलन राज्य उपाध्यक्ष अ‍ॅड. कैलास मोरे यांनी केला आहे. कर्जतधील सरकारी, निमसरकारी, खासगी शाळा/उच्च माध्यमिक शाळा/कॉलेज यांच्याकडे इमारत निधी व अ‍ॅडमिशन शुल्कवाढीचा हिशोब प्रत्येक पालकाने माहितीच्या अधिकाराने घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

10 वी व 12 वी चे निकाल लागले त्यानंतर पुढील प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. कर्जतमधील अनेक शाळा/ कॉलेज इमारत निधी तसेच प्रवेश शुल्काच्या नावाखाली बेकायदेशीररीत्या भरमसाठ फी वसुली करीत आहेत. महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम 2011 तसेच फी घेणेसंदर्भातील इतर कायद्यानुसार, शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार अशा शाळा/कॉलेजनी विद्यार्थ्यांकडून नियमानुसार प्रवेश शुल्क आकारले पाहिजेत. परंतु अनेक शाळा/कॉलेज कायद्याचे व नियमांचे पालन न करता विद्यार्थ्यांकडून भरमसाठ इमारत निधी तसेच इतर शुल्काच्या नावाखाली पैसे वसुल करीत आहेत. सदरची बाब विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहे, असे अ‍ॅड. मोरे यांनी सांगितले.

Exit mobile version