पहिलीपासून सेमी इंग्रजीचे शिक्षण

कर्जत तालुक्यात जिल्हा परिषद शाळेत सेमी इंग्रजी माध्यमाचे शिक्षण

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सात शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू झाले असून पहिली ते सातवी साठी तब्बल 539 विद्यार्थ्यांचे प्रवेश पालकांनी केले आहेत. कर्जत तालुक्यातील पालकांनी शिक्षण विभागाच्या आवाहनाला प्रतिसाद देत तब्बल 539 विद्यार्थ्यांची नोंद सेमी इंग्रजी माध्यमासाठी आपल्या पाल्यांना पाठवून जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षणावर विश्‍वास व्यक्त केला आहे. नवीन आर्थिक वर्षे सुरू होत असताना शिक्षण विभागाने सेमी इंग्रजी माध्यमाच्या शिक्षण प्रवेश याबद्दल आवाहन केले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात वर्ग सुरू होत असलेल्या बांधीवली, पोशीर, नेरळ, आंबोट, कडाव, टाकवे, कळंब येथे हे वर्ग सुरू झाले आहेत. त्यात सर्व सात शाळांमध्ये सुरू झालेल्या वर्गात यावर्षी तब्बल 539 विद्यार्थी सेमी इंग्रजी माध्यमाचे शिक्षण घेणार आहेत.

सात शाळेतील वर्गात 539 विद्यार्थ्यांचे प्रवेश

तालुक्यात सर्वाधिक 131 विद्यार्थी हे नेरळ येथील सेमी इंग्रजी शिक्षण घेण्यासाठी प्रवेशकर्ते झाले आहेत. 109 विद्यार्थी हे कडाव जिल्हा परिषद शाळेत तर 90 विद्यार्थी कळंब येथील शाळेत सेमी इंग्रजी माध्यमाचे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला आहे. तर पहिलीच वर्गात 142 विद्यार्थी यांचे प्रवेश निश्‍चित झाले असून 29 विद्यार्थी हे कळंब येथील पहिलीचे वर्गात शिकू लागले आहेत. कर्जत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने 32 शिक्षकांची निवड सेमी इंग्रजी शाळेसाठी केली आहे.

Exit mobile version