। म्हसळा । वार्ताहर ।
म्हसळा तालुका कुणबी समाज पश्चिम विभाग यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष महादेव भिकू पाटील मार्गदर्शन करतेवेळी म्हणाले की, म्हसळा तालुका कुणबी समाज हीत जोपासत असतांना पश्चिम विभाग कुणबी समाजाने शैक्षणिक कार्यात मदत करणारे आदर्श पाऊल उचलले, त्याचे आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. या विभागाचे आदर्श अन्य तिन विभागांनी घ्यावे. त्या करीता नक्कीच आम्ही देखील मदत करु.
यावेळी महाड खाडी, कोळे, तळवडे, कुंभळे, पानवे, केलटे, नेवरूळ, जांभुळ अशा शाळांमधील 180 विद्यार्थांना प्रत्येकी 4 वह्या, पेन व पट्टी देऊन शैक्षणिक कार्यास हातभार लावण्याचे योगदान कुणबी पश्चिम विभाग अध्यक्ष धोंडू चव्हाण सचिव महेश पवार व त्यांचे पदाअधिकारी यांनी केले आहे. यावेळी महेंद्र धामणे, सदानंद पाखड, राजेंद्र भोगळ, शकर उंडरे, मधुकर पवार, सदानंद डिंगणकर, किसन पवार, शांताराम कोबनाक, वैभव शिगवण, संजय शिगवण, देवजी चव्हाण, भिकू चव्हाण, दौलत रटाटे तसेच ग्रामस्थ, महिला मंडळ, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.