भरावाचा मीठ उत्पादनावर परिणाम

। उरण । वार्ताहर ।

अखेरची घरघर लागलेल्या पारंपरिक मीठ उद्योगाला आता सातत्याने बदलणार्‍या पर्यावरण आणि समुद्रातील वाढत्या मातीच्या भरावाचा उत्पादनावर ही परिणाम झाला आहे. त्यामुळे मीठ तयार होण्यासाठीचा कालावधी पंधरा ऐवजी 30 दिवसांवर पोचला आहे. परिणामी मीठ उत्पादकांवर आर्थिक संकट ओढवले आहे.

रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीवर मिठागरे हा मोठा व्यवसाय होता. मात्र, जिल्ह्यातील वाढत्या औद्योगिक क्षेत्रामुळे मीठ व्ययसाय कमी होऊ लागला आहे. यामध्ये उरण तालुका हा मीठ उत्पादक म्हणून अग्रेसर ठिकाण होते. येथून रेल्वेच्या माल गाडीने मीठाची वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जात होती. उरणमध्ये मिठागर कामगार व मालकांची संख्या अधिक आहे. मात्र, सिडकोच्या माध्यमातून येथील खाडी किनार्‍यावरील शेतजमीनी बरोबरच मिठागरांच्या जमिनीही संपादीत केल्या आहेत. या जमिनीवर उद्योग, रस्ते, निवासी इमारती व नागरी सुविधा यासाठी मातीचा भराव सुरू आहे. यामध्ये शेतीसह मिठागरे ही बुजविली आहेत.

Exit mobile version