जलप्रदूषण कायदा प्रभावीपणे राबवा

राज्यसभा खासदार समितीची सूचना,अलिबाग किनार्‍याची पाहणी
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
केंद्र सरकारने केलेल्या जलप्रदुषण कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जावी,अशी सक्त सूचना राज्यसभा खासदार समितीने रायगड जिल्हा प्रशासनाला केलेली आहे.
अलिबाग समुद्रकिनारी जल प्रदूषणाबाबत असणार्‍या कायद्याचे पालन प्रशासनाकडून केले जात आहे की नाही याबाबत गुरुवारी राज्यसभेच्या बारा खासदारांची समिती रायगडात दाखल झाली. अलिबाग समुद्रकिनार्‍याची पाहणी करून कुलाबा किल्याला समितीने भेट दिली.
यावेळी खासदार प्रतापसिंग बजवा, खासदार वंदना चव्हाण, दुष्यांत चव्हाण, विकास महात्मे, राम विचार नेताम, नरसिंह राव, तिरुची सेवा, विशाल सिंह, अरुण शर्मा, रवींद्र कुमार, बी. के. सिन्हा, विवी एस खर्‍यात, प्रदीप तामता, विवेक तनखा या बारा खासदाराची समिती आली होती. यावेळी जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे, नगराध्यक्ष प्रशांत नाईक, नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते.
खासदारांच्या समितीचा पाच दिवसांचा हा दौरा असून मुंबईत दोन दिवस पाहणी केल्यानंतर आज अलिबागला भेट दिली. त्यानंतर ही समिती गोवा राज्यात दोन दिवसांच्या दौर्‍यावर जाणार आहे.
राज्यसभेत विविध कायदे बनविले जातात. जल प्रदूषणबाबतही कायदा राज्यसभेत पारित केला आहे. मात्र जल प्रदूषण कायदे हे पाळले जात नसल्याने त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागतात. जल प्रदूषण कायद्याची अंमलबजावणी राज्यातील प्रशासन हे योग्य पद्धतीने अमंलबाजवणी करीत आहेत का यासाठी खासदारांची कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे. या कमिटीमार्फत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन जल प्रदूषणाबाबत माहिती गोळा केली जाते.


कायद्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत आहे का, समुद्राचे प्रदूषण कमी करण्यासाठी काय उपययोजना करणे आवश्यक आहे. अधिकारी, प्रशासन यांना काय अडचणी येत आहेत. याबाबतची माहिती समितीमार्फत घेण्यात आली आहे.
खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण

Exit mobile version