दहावीचा निकाल शंभर टक्के लावण्यासाठी प्रयत्न करावेत : नरेंद्र जैन

। नागोठणे । वार्ताहर ।

दहावीचा निकाल शंभर टक्के लावण्यात आपल्याला अपयश आल्याने संकुलाचे दिवंगत अध्यक्ष बापूसाहेब देशपांडे यांनी सुरू केलेली दहावीच्या विद्यार्थ्यांचे ज्यादा अभ्यास वर्ग घेण्याची पद्धत पुन्हा सुरू करून दहावीचा निकाल शंभर टक्के लावण्यासाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्न करावेत असे बहुमोल मार्गदर्शन अग्रवाल विद्यामंदिरच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नरेंद्र जैन यांनी केले.

कोकण एज्युकेशन सोसायटीच्या येथील बापूसाहेब देशपांडे विद्या संकुलातील अ.जे. जैन प्राथमिक शाळा, अग्रवाल विद्यामंदिर व एस. पी. जैन ज्युनिअर कॉलेजचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी जैन बोलत होते. यावेळी नरेंद्र जैन यांच्यासह प्राथमिक शाळा समिती चेअरमन अनिल काळे, नागोठ्ण्याचे माजी सरपंच विलास चौलकर, शाळा समिती सदस्य राजेंद्र जैन, अ‍ॅड. सोनल जैन, जयराम पवार, सुभाष जैन, नागोठणे विभाग सहकारी भात गिरणीचे संचालक तानाजी लाड, आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. संदेश गुरव, अग्रवाल विद्यालयाच्या प्राचार्या राधिका ठाकूर, निवृत्त शिक्षक भास्कर सोलेगांवकर, प्रतिभा तेरडे, अजिता घोडींदे, स्नेहसंमेलनाच्या कार्याध्यक्षा प्रिती दरेकर, भरत भांगरे, प्राथमिक शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका अनघा लोखंडे, राजश्री शेवाळे, सकाळ सत्र प्रमुख नेताजी गायकवाड, दुपार सत्र प्रमुख रमेश जेडगे, शिक्षक प्रतिनिधी अबेसिंग गावित, शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी व वरिष्ठ लिपिक संतोष गोळे, सुजित चौलकर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version