। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
रत्नागिरी-आजिवली मार्गावर पाचलहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या एसटी बसचा अपघात झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. 25) सकाळी सौन्दळ रेल्वे स्टेशनजवळ सकाळी 8.10 वाजण्याच्या सुमारास घडला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, दुधाने भरलेला आयशर ट्रक (एमएच0933880) हा ओणीहून पाचलच्या दिशेने भरधाव वेगाने जात असताना, चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्याने समोरून येणाऱ्या एसटी बसला जोरदार धडक दिली. यावेळी बसमध्ये अंदाजे 30 ते 35 प्रवासी प्रवास करत होते. या अपघतात काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. आयशर ट्रकचा चालक आणि क्लिनर यांना जास्त दुखापत झाली असून त्यांना रायपाटण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर काही काळ मार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.






