कर्नाटकमध्ये बस पलटी; आठजण जागीच ठार तर, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

। कर्नाटक । वृत्तसंस्था ।
कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यातील पावागडजवळ बस उलटून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 8 जणांचा जागीच मृत्यू झाला असून विद्यार्थ्यांसह 20 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत असून, बचावकार्य सुरू असल्याचे तुमकूर पोलिसांनी सांगितले आहे. तसेच, अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत असून मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त होत आहे.

Exit mobile version