| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
स्वातंत्र्य दिनाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर 15 जुलै ते 15 ऑगस्ट 2026 या कालावधीत ऐतिहासिक लाल किल्ला सर्वसामान्य पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (एएसआय) विभागाने याबाबत आदेश जारी केला आहे. या काळात ऑनलाइन किंवा ऑफलाइन तिकीट आरक्षित केलेल्या पर्यटकांनाही प्रवेश मिळणार नाही. दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधानांच्या ध्वजारोहण आणि भाषणाच्या तयारीसाठी सुरक्षा व्यवस्था, रंगीत तालीम आणि अन्य कामांमुळे लाल किल्ला परिसर बंद ठेवला जातो. 15 ऑगस्टनंतर पर्यटकांसाठी प्रवेश पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे.







