| पनवेल | वार्ताहार
म्हाडाची रूम देतो असे सांगून आठ लाख रुपये घेतले आणि बांद्रा मेट्रो कोर्ट या ठिकाणी म्हाडाची रूम न देता पैसे देखील परत दिले नाहीत. याप्रकरणी सचिन शिवाजी लोंढे आणि कल्पना संतोष धोत्रे (दोघेही राहणार विजयनगर, कल्याण ईस्ट) यांच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
विमल पंडित रमसुल या खारघर, सेक्टर 12 येथे राहतात. त्यांचा चणा वाटाणे विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचा मयत मुलगा संतोष यांच्या ओळखीचे सचिन लोंढे आणि कल्पना संतोष धोत्रे आहेत. ते नेहमी घरी येत असल्याने त्यांच्याशी ओळख झाली. यावेळी बांद्रा मेट्रो कोर्ट या ठिकाणी म्हाडाची रूम घेऊन देतो असे त्यांनी सांगितले. त्यानुसार त्यांनी अडीच लाख रुपये घेऊन एम ओ यू अग्रीमेंट तयार केले. त्यानंतर पुन्हा तीन लाख 95 हजार रुपये घेतले. असे 2018 ते 2023 पर्यंत एकूण आठ लाख रुपये घेतले, आणि ते परत केले नाहीत. पैशांची मागणी केली असता पैसे देखील परत केले नाहीत आणि म्हाडाची रूम देखील दिली नाही.
आठ लाखांची फसवणूक
