| पनवेल | वार्ताहर |
स्वस्तात फ्लॅट देतो असे सांगून, प्रत्यक्षात फ्लॅट न देता भरलेली रक्कम ही परत न केल्याप्रकरणी संभाजी शिवाजी सपकाळ नावाच्या व्यक्तीविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दिलीप दळवी हे फणसपाडा, सीबीडी बेलापूर येथे राहत असून, ते सेवानिवृत्त आहेत. त्यांनी संभाजी सपकाळ यांच्या ऑर्चिड ब्लोसॉम या नावाच्या प्रोजेक्टमध्ये फ्लॅट खरेदी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी 7 लाख आठ हजार रुपये चेकद्वारे दिले. यावेळी प्रोजेक्टचे काम पूर्ण झाल्यानंतर बुकिंग प्रमाणे फ्लॅट देण्यात येतील असे त्यांना सांगितले. 2016 पासून पैसे घेऊन फ्लॅट दिला नाही. दळवी हे कंपनीच्या कार्यालयात गेले असता कार्यालय बंद मिळून आले. मोबाईल क्रमांकवर संपर्क साधला असता उडवाउडवीची उत्तरे देऊन फोन उचलण्याचे बंद केले. त्यानंतर सपकाळ यांनी दळवी यांना एक चेक दिला होता. दरम्यान दळवी यांच्याकडे दिलेला चेक त्यांनी बँकेत टाकला असता तो देखील बाऊन्स झाला. यावेळी सपकाळ यांनी भरलेली रक्कम परत केली नाही.







