आठ माओवाद्यांचा खात्मा

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील सारंडा जंगलात सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या भीषण चकमकीत एक प्रमुख माओवादी कमांडर अनल दा उर्फ तुफान ठार झाला. त्याच्यावर एक कोटी रुपयांचे बक्षीस होते. तसेच या चकमकीत आठ माओवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. ही कारवाई कोब्रा आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने केली. गुरुवारी सकाळी पश्चिम सिंहभूममध्ये माओवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबार झाला. किरीबुरु पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सारंडा जंगलातील कुमडी येथे ही चकमक झाली. जोरदार गोळीबार झाला, ज्यामध्ये अनल दा याच्यासह आठ माओवादी ठार झाले. अनल दा ठार होणे हे सुरक्षा दलांसाठी हे एक मोठे यश आणि माओवाद्यांना मोठा धक्का मानला जात आहे.

Exit mobile version