दरडप्रणव क्षेत्रात नव्याने आठ गावे समाविष्ट

| रसायनी | वार्ताहर |

खालापूर तालुक्यात गेल्या वर्षी 9 गावांचा दरडप्रणव क्षेत्रात समावेश होता. त्यात आणखी 8 गावांचा समावेश झाला असून सुभाषनगर खोपोलीच्या अहवालानुसार वर्ग-1 मध्ये असल्याने तेथे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी यांनी मान्सूनपूर्व तयारीची बैठक व आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण या दोन्ही गोष्टींचा अभ्यास केला असून नैसर्गिक आपत्तीस सामोरे जाण्याची तयारी केली आहे. सुभाषनगर वर्ग 1, दत्तवाडी वर्ग 3, तोंडली वर्ग 3 यांचा सर्व्हे झाला असून काजूवाडी, ताडवाडी, गारभाट धनगरवाडी, बिडखुर्द, जांबरुंग, चिंचवली गोहे यांचा सर्व्हे झालेला नाही. तर, टेंबेवाडी, जंगमवाडी, चांगवाडी, हाशाची पट्टी, काटवन, ढेबेवाडी-बर्गेवाडी, मुठा (माडप ठाकूरवाडी) व वीरगाव (कुंभीवली ठाकूरवाडी) या आठ गावांचा नव्याने संभाव्य दरडप्रणव म्हणून आराखड्यात सामाविष्ट कऱण्यात आली आहेत. मात्र, यांचाही सर्व्हे झाला नाही. यातील सुभाषनगर यांचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी दिली.

सन 2023 ला सुभाषनगर याचे तात्पुरते स्थलांतर मस्को वर्कर कॉलनी खोपोली येथे कऱण्यात आले होती. दत्तवाडी येथील लोकांची सोय अनुभविक प्रशिक्षण संस्था नारंगी येथे कऱण्यात आली होती. काजूवाडी येथिल 5 कुटुंबाचे स्थलांतर त्यांच्या नातेवाईक यांच्या घरी केले होते. ताडवाडी येथील दरडप्रणव क्षेत्रातील लोकांचे रायगड जिल्हा परिषद शाळा आंबेवाडी, तर काहींचे चिंचमाळ येथिल साई मंदिरात सोय झाली होती. गारभाट धनगरवाडी ही खालापूर व कर्जत तालुक्याच्या सीमेवर असून त्यांना जवळचे व सोयीचे ठिकाण माथेरान असल्याने माथेरान येथील त्यांचें नातेवाईक यांच्या घरी सोय कऱण्यात आली होती. बीडखुर्द व जांबरुंग येथिल दरडप्रणव लोकांची सोय अष्टविनायकमधील महड देवस्थानच्या भक्त निवासात कऱण्यात आली होती. टेंबेवाडी मधील लोक हनुमान मंदिर टेंबेवाडी, जंगमवाडी यांची समाज मंदिर, चांगवाडी यांची समाजमंदिर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, हाशाची पट्टीमधील दोन घरांची सोय कर्जत तालुक्यातील मोहाचीवाडी नेरळ येथे कऱण्यात आली होती.

Exit mobile version