कार आणि ट्रकच्या धडकेत आठ प्रवाशांचा मृत्यू 

| भोपाळ | वृत्तसंस्था |

इंदूर-अहमदाबाद महामार्गावर कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 8 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही कार पोलीस शिपाई चालवत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

इंदूर-अहमदाबाद महामार्गावर धार इथे भरधाव कारचा टायर फुटल्याने कार उभ्या असलेल्या ट्रकवर आदळून अपघात झाला. घटनेची माहिती मिळाताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. मात्र, या अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. ही कार पोलीस शिपाई चालवत असल्याची माहिती मिळाली असून त्यांचाही मृत्यू झाला आहे.

या भीषण अपघाताचा पुढील तपास बेटमा पोलीस स्टेशनचे कर्मचारी करत आहेत.

Exit mobile version