। पनवेल । विशेष प्रतिनिधी ।
खारघर येथील कार्यक्रमात उपस्थित असलेल्या काही जणांना उन्हाचा त्रास जाणवू लागल्याने आठजण दगावल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. दरम्यान मृतांची संख्या वाढण्याची भिती व्यक्त होत आहे.
कार्यक्रमस्थळी सुमारे 300 जणांना याचा त्रास जाणवू लागला होता. कार्यक्रमस्थळी उपस्थित वैद्यकीय अधिकार्यांनी उपचार केले. मात्र जे अत्यवस्थ होते त्यांना अधिक उपचारांसाठी कामोठे येथे एमजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या सर्वांची विचारपूस करण्यासाठी शिंदे हे रात्री उशिरा रुग्णालयात आले होते. त्यांनीच याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. त्यांनी या जखमींवर योग्य ते उपचार करण्याचा सूचना वैद्यकीय अधिकार्यांना केल्या. जे मृत झालेत त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख देण्याची घोषणाही त्यांनी केली.