| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ परिसरात मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्या गुन्ह्यांचा तपास करताना नेरळ पोलिसांनी विविध ठिकाणांहून अनेक मोबाईल जप्त करून चोरीचे गुन्हे उघड झाले आहेत. यावेळी तब्बल आठ मोबाईल ताब्यात घेण्यात आले आहेत.
नेरळ परिसरातून विविध भागांतून आठ मोबाईल चोरीला गेले होते. त्यामध्ये विवो, सॅमसंग, अँपल, एमआय या कंपनीचे मोबाईल चोरीला गेले होते. या बाबतच्या तक्रारी नेरळ पोलीस ठाण्यात करण्यात आल्या होत्या. त्यानंतर नेरळ पोलीस ठाण्या तर्फे मोबाईल मिशन रबावण्यात आले. हे मिशन नेरळ पोलीस स्टेशन आणि अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक विजय शिवतरे, पोलीस उप अधीक्षक राहुल गायकवाड, नेरळचे प्रभारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली व गुन्हे अन्वेषण विभागाचे विनोद वांगणीकर, राजेभाऊ केकाण, आशु बेंद्रे, सचिन वागमारे यांचा माध्यमातून रबावण्यात आले. यावेळी राजस्थान, पुणे, मुबंई या ठिकाणावरून हे मोबाईल जप्त करण्यात आले. त्यानंतर हे मोबाईल नेरळ पोलीस स्टेशन येथे आणून त्यांच्या मुल मालकांना परत करण्यात आले आहेत.







