‘एक पेड़ माँ के नाम’

। उरण । प्रतिनिधी ।

ओएनजीसी उरण संयंत्रने अलिबागचा वन विभाग आणि एनजीओ शृंखला यांच्या संयुक्त विद्यमाने 28 सप्टेंबर रोजी भारत सरकारच्या ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमाचा एक भाग म्हणून कोळघर येथे 10 विविध देशी जातींचे सुमारे 10 हजार सीडबॉल टाकण्यात आले होते. ओएनजीसी टीमचे नेतृत्व हेड मेंटेनन्स आणि ऑफिशिएटिंग प्लांट मॅनेजर विक्रम सिंग, मुख्य अभियांत्रिकी सेवा वायव्हीटीआर शेखर, जीएम हेड एचआर भावना आठवले आदींनी केले. यावेळी स्थानिक आदिवासी महिलांनी स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने सीडबॉल तयार केले होते. ज्यामुळे त्यांना उदरनिर्वाहही झाला. जवळच्या आश्रमशाळेतील सुमारे 400 हुन अधिक मुलांनी यात सहभाग घेतला होता.

Exit mobile version