सातिर्जे येथे एक पेड उनकी याद में उपक्रम

। अलिबाग । प्रतिनिधी ।
सातिर्जेचे उपसरपंच अ‍ॅड. उमेश ठाकूर यांच्या एक पेड उनकी याद में या संकल्पनेतून पंचायत हद्दीत लोकसहभागातून वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. याअंतर्गत ग्रामस्थांनी आपल्या निधन पावलेल्या प्रियजनांच्या स्मृतीत रोपांची लागवड केली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले आहे.

याप्रसंगी सरपंच प्राजक्ता खंडपे, ग्रामसेवक पूजा पाटील, सदस्य दिपक राऊळ, दिपाली बोंबटकर, पल्लवी जोशी, किर्ती आग्रे, रूपाली कदम, प्रतिक कोळी, यज्ञेश पाटील, संदीप पाटील, दिनेश जोशी, कृष्णा बोंबटकर, सुबोध नाईक, निलेश ठाकूर, परेश जोशी, दिवेश जोशी, रोहन राऊळ, स्वराज पाटील, सुमित भोळे, स्वप्नील चोघले, महेश तांबे, प्रवीण सांडे, नितील पाटील, जितेंद्र ठाकूर, देवेंद्र राऊळ, सतीश राऊळ, किशोर परब, रवीना ठाकूर, कविता बोंबटकर, सुरक्षा बोंबटकर, आकांक्षा घाणेकर, वंदना राऊत, विनीता जोशी, संगीता सुर्वे, गिनिषा फुटके, उन्नती आंग्रे व ग्रामस्थ उपस्थित होते.

याप्रसंगी आपल्या मनोगतात अ‍ॅड. उमेश ठाकूर म्हणाले की, अनेक वेळेला वृक्षारोपण हा शोभेचा भाग होतो. वृक्षारोपण केल्यानंतर त्याचे संवर्धन होत नाही. याकरिता सातिर्जे गावात लोकसहभागातून ङ्गएक पेड उनकी याद मेंफ हा वृक्षारोपण तथा संवर्धन प्रकल्प राबविण्यात आला असल्याचे त्यांनी नमूद केले. उपक्रमाचे स्वरूप विशद करताना यामध्ये सहभागी प्रत्येकाने आपल्या निधन पावलेल्या प्रियजनांच्या नावे झाड लावली. जे झाड लावले आहे, त्यावर ज्याच्या नावे झाड लावले आहे, त्यांचे नाव आणि जो संवर्धित करणार आहे त्याचे नाव, असा एक संयुक्त टॅग लावण्यात आला.

Exit mobile version