। आक्षी । संतोष राऊळ ।
नागांव साताड बंदर (माती बंदर) येथे गुढीपाडव्यानिमित्त बैलगाडी, घोडागाडी स्पर्धा ठेवण्यात आली होती. या स्पर्धेचे आयोजन सचिन राऊळ व राकेश राणे यांनी केले होते. स्पर्धेत शेकडो बैलगाडी स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा थरार पाहण्यासाठी साताड बंदरावर हजारो नागरिकांनी गर्दी केली होती.

सदर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी नागाव सरपंच निखिल मयेकर, सचिन राऊळ, राकेश राणे व मित्रमंडळ आणि नागाव परिसरातील बैलगाडी शर्यतप्रेमींनी मेहनत घेतली. या शर्यतीमध्ये महाराष्ट्र किंग मथूरचे मालक राहुलभाई पाटील, शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील, ज्येष्ठ नेते द्वारकानाथ नाईक, शिवसेना (ठाकरे गट) नेते सुरेंद्र म्हात्रे, अमीर ठाकूर आदींसह नागाव परिसरातले सर्व मान्यवरही उपस्थित होते. या स्पर्धेचे सूत्रसंचालन विकास पिंपळे यांनी केले. तसेच मान्यवरांचे स्वागत ग्रामपंचायत सदस्य व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

ही स्पर्धा 22 गटात घेण्यात आली. सरासरी प्रत्येक गटात 10 ते 15 स्पर्धक सहभागी झालेले होते. त्यामुळे संध्याकाळी उशिरापर्यंत ही स्पर्धा सुरु राहिली.