मर्दनगडावर एकविरा मातेचा पालखी सोहळा

| चिरनेर | प्रतिनिधी |

उरण तालुक्यातील आवरे येथील ऐतिहासिक मर्दनगडावर श्री एकविरा मातेचा पालखी सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. 24 व 25 मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या या यात्रा सोहळ्यात हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. या यात्रेची सुरुवात 24 मार्च रोजी रात्री आईच्या गोंधळाने करण्यात आली. आईच्या गोंधळाचा मान हर्षला दिलेश ठाकूर यांना देण्यात आला. 25 मार्च रोजी सकाळी गडावर विधिवत अभिषेक, गडपूजन आणि होमहवन करण्यात आले. यावेळी अभिषेकाचा मान संजीवनी किरण ठाकूर यांना देण्यात आला. दुपारी भोलानाथ मंदिर ते मर्दनगड दरम्यान भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावर्षी पालखी सोहळ्याचा मान महिलांना देण्यात आला होता. महिला पालखी खांद्यावर घेऊन गडाची वाट चढल्या. पालखी मिरवणूकीत एकविरा मातेचा जयघोष होत होता. मिरवणुकीने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

याप्रसंगी सरपंच निरा पाटील, दुर्ग अभ्यासक दुर्गसेवक कैलासराजे घरत, महेश गावंड, ॲड. सुभाष कडू, सुरेश गावंड, संतोष पाटील, संजय गावंड, मयुर गावंड, शाखाप्रमुख सुनील ठाकूर, अरुण गावंड, प्रशांत भोईर, जे डी भोईर, चेतन पाटील, के. टि. बाळू म्हात्रे, प्रशांत म्हात्रे, विद्याधर गावंड, गणेश ठाकूर यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेकांनी उपस्थित राहून यात्रा सोहळ्याचा आनंद घेतला. एकविरा आईची यात्रा यशस्वी करण्यासाठी कौशिक ठाकूर, दिलेश ठाकूर, दिपेश ठाकूर, तुषार म्हात्रे, विनोद ठाकूर, शानेश गावंड, शंकर पाटील, प्रमोद ठाकूर, धिरज ठाकूर, राजेश ठाकूर, हितेंद्र म्हात्रे, ओम ठाकूर, प्रशांत ठाकूर या सर्वांनी विशेष परिश्रम घेतले.

Exit mobile version