मोठ्या भावाने केली लहान भावाची हत्या

| अमरावती | वृत्तसंस्था |

रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा पराभव केला. अमरावती जिल्ह्यात मात्र, हा पराभाव सहन न झाल्याने याचा दोष लहान भावाला देत मोठ्या भावाने त्याची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

मटन खाऊन आल्यामुळे भारत हरला असे म्हणत मोठ्या भावाने आपल्या लहान भावावर आणि वाडिलांवर लोखंडी रॉडने हल्ला केला. त्यामध्ये लहान भावाचा मृत्यू झाला, तर वडील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना अमरावती जवळील अंजनगाव बारी गावात घटना घडली. अंकित इंगोले (28) असे हत्या करण्यात आलेल्या लहान भावाचे नाव आहे. वडील रमेश इंगोले हेही जखमी झाले आहेत. प्रवीण इंगोले (32) असे आरोपी भावाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी तिघे जण घरी असतांना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना पाहत होते. यावेळी तिघे मद्यपान करत होते. दरम्यान, वडील आणि लहान भावाने मटन खाल्ले. सामना सुरू असतांना ऑस्ट्रेलियाचे पारडे जड झाले आणि त्यांनी भारताला नमवत विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकला. भारताच्या संघाचा झालेला हा पराभव प्रवीणला रुचला नाही. त्याने वडील आणि भावावर हल्ला केला.

Exit mobile version