। आगरदांडा । प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीकरिता मतदान प्रक्रिया सुरु आहे. अपंगत्वाला मात करत 80 वर्षीय मतदार गजानन मांदाडकर हे रिक्षामधून शिघ्रे मतदान केंद्रावर आपले बहुमूल्य मत देण्यासाठी आले. तसेच, मतदार चांगुना वारगे (82) व नारायण पेरवे (85) हेदेखील अपंगत्वाला मात करत लोकशाहीचा हक्क बजाविण्यासाठी अंबोली मतदान केंद्रावर हजर झाले होते. यावेळी मतदान केंद्रावर इतर मतदारांचीही गर्दी दिसून आली. निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी मतदान केंद्राच्या परिसरात पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.
अपंगत्वावर मात करत केले मतदान
