| पेण | प्रतिनिधी |
पेण जिते हद्दीतील मंजुळा नामदेव जोशी, वय 70 वर्षे ही महिला 6 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजून 56 मिनीट ते सायंकाळी 5 वाजून 15 मिनिटांच्या दरम्यान वीर, ता. महाड येथून घरी जिते येथे येत असताना बेपत्ता झाली आहे. दरम्यान, साक्षीदार प्रवीण दामोदर ठाकूर यांनी बेपत्ता महिलेस हमरापूर रेल्वे स्टेशन येथे पाहिले असता तिला जिते रेल्वे स्टेशन येथे उतरण्यास सांगितले. परंतु, ती जिते रेल्वे स्टेशन येथे न उतरता कोठेतरी निघून गेली, ती अद्यापही घरी परत आली नाही. ती बेपत्ता झाल्याची फिर्याद पेण दादर सागरी पोलीस ठाण्यात त्यांच्या मुलीने दि. 8 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजून 53 मिनिटांनी तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा नोंदविला आहे.
या फिर्यादीमध्ये वर्णन केल्यानुसार मंजुळा नामदेव जोशी, वय 70 वर्ष, रा. जिते, ता. पेण, जि. रायगड, उंचीने 5 फूट 06 इंच, रंगाने गहुवर्ण, केस कुरळे व लांब, नाक सरळ, डोळे घारे, चेहरा उभट, नेसून तांबूस रंगाची काष्टी पातळ लुगडा, तांबसू रंगाची चोळी, पायात चप्पल, गळ्यात डिस्को मण्यांची माळ, हातात पितळेच्या बांगड्या, कापडी पिशवी, जवळ खर्चापुरते पैसे असल्याचे सांगितले आहे. तरी, या वर्णनाची महिला कुठे आढळल्यास पेण दादर सागरी पोलीस ठाणे दूरध्वनी क्र. 8830447256 वर संपर्क करावा, असे आवाहन पोलीस ठाणे दादर यांच्याकडून करण्यात आले आहे.







