सुधागड येथील वृद्ध महिला बेपत्ता

| पाली/बेणसे | वार्ताहर |
सुधागड तालुक्यातील पडसरे येथील 62 वर्षीय महिला दि. 15 ऑक्टोबर रोजी खालापूर जाताना बेपत्ता झाली आहे. या महिलेचे नाव लक्ष्मी वामन चोरघे आहे. आपला मुलगा अनंता चोरघे, रा. ठेकू, ता. खालापुर याच्याकडे जाते असे शेजारी सांगून घरातून निघून गेली ती अद्याप घरी आलेली नाही. सदर महिलेची उंची 4.5 फूट, अंगाने मध्यम, गोरा रंग, गोल चेहरा, बसके नाक, गळ्यात काळ्या मण्याची माळ, निळ्या जांभळ्या रंगाचे साडी, पायात चप्पल घातली आहे. या महिलेला कोणी पाहिले असल्यास पाली पोलिसांना कळवावे, असे आवाहन पाली पोलिसांनी केले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस नाईक सीमा चांदोरकर, पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

Exit mobile version