| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव जवळील कुंभे पुनर्वसन वसाहत भादाव येथील 74 वर्षाच्या वृद्ध महिलेची तिच्याच राहत्या घरात अज्ञात चोरट्यांनी शिरून तिची हत्या करून सोन्याचे दागिने घेऊन चोरटा पसार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले असून, रायगड पोलीस चक्रावून गेले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, माणगाव तालुक्यातील भादाव गावाजवळ असणाऱ्या कुंभे पुनर्वसन वसाहत भादाव येथे शांताबाई शंकर कांबळे (74) ह्या राहत होत्या. सोमवारी (दि.1) सायंकाळी साडे सहा वाजेपासून मंगळवारी (दि.2) सकाळी साडे दहा वाजण्याच्या दरम्यान मौजे कुंभे पुनर्वसन वसाहत भादाव येथे मयत शांताबाई शंकर कांबळे (74) यांच्या घरात कोणीतरी अज्ञात व्यक्तीने ती वृद्ध महिला एकटीच असताना अज्ञात आरोपीने त्यांचे घरामध्ये प्रवेश करून कोणत्यातरी हत्याराने त्यांना ठार मारून त्यांचे अंगावरील 50 हजार रुपये किमतीचे सोन्याचे चैन 10 ग्राम वजनाची तसेच 50 हजार रुपये किमतीचे हातातील सोन्याच्या 1 जोड बांगड्या 10 ग्राम वजनाच्या असा एकून 1 लाख किमतीची हत्या करून जबरी चोरी केली.
या घटनेची तक्रार रामचंद्र बावदाने रा. उतेखोल गाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली या प्रकरणी माणगाव पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेची माहिती मिळताच रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल माणगाव उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी, स्थानिक गुन्हा शाखेचे मिलिंद खोपडे यांनी घटनास्थळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांनी भेट देवून तपास सुरु केला आहे.
भादाव येथील वृद्ध महिलेची हत्या करून केली चोरी
